शिवसेना नेते मोहन रावले यांचे निधन ; संजय राऊत यांनी वाहिली श्रद्धांजली

शिवसेना नेते मोहन रावले यांचे निधन ; संजय राऊत यांनी वाहिली श्रद्धांजली

 शिवसेना नेते मोहन रावले यांचे निधन ; संजय राऊत यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : शिवसेना नेते मोहन रावले यांचे आज निधन झाले. मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात.गोवा येथे गेले असताना त्यांना हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येतेय. दक्षिण मुंबईत शिवसेना रुजवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. मोहन रावले यांनी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे पाचवेळा प्रतिनिधित्व केले होते. शिवसेनेतील बड्या नेत्यांपासून ते शिवसैनिकांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचा दांडगा संपर्क होता. मोहन रावले यांचे पार्थिव आज मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी आणले जाणार आहे.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी मोहन रावले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. "परळ ब्रँड "शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला विनम्र श्रद्धांजली, असे राऊत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments