Type Here to Get Search Results !

धक्कादायक! 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये सापडला कोरोनाचा नवा स्ट्रेन

 



धक्कादायक! 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये सापडला कोरोनाचा नवा स्ट्रेन 



मेरठ : कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे. भारतात देखील युरोपीय देशांमधून आलेल्या काही नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे. याच दरम्यान एक माहिती समोर आली आहे. 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटनहून एक कुटुंब उत्तर प्रदेशातील मेरठ इथे दाखल झालं. त्यानंतर कोरोनाची चाचणी करण्यात आली ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं त्याचे नमुने दिल्लीला तपासणीसाठी देण्यात आले. आई वडिलांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मात्र कुटुंबातील 2 वर्षीय चिमुकलीला नव्या कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून हे कुटुंब राहात असलेला परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.



या परिसरातील नागरिकांच्या प्रशासनाकडून चाचण्या केल्या जात आहेत. यापूर्वी युरोपी देशातून भारतात आलेल्या 6 जणांनाही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं दिसून आली आहेत. यापैकी बेंगळुरू 3, हैदराबाद 2 तर पुण्यातील एका व्यक्तीचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.



कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळल्यानंतर युरोपमधील बर्या च देशांमध्ये हा सापडला आहे. आतापर्यंत डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबेनॉन, सिंगापूर आणि आता भारतात देखील नव्या कोरोनाचा शिरकाव होत असल्याचं आढळून आल्यानं भीतीचं वातावरण आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies