Type Here to Get Search Results !

“भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली” : राष्ट्रवादीच्या या नेत्याचा भाजपला टोला




 “भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली” : राष्ट्रवादीच्या या नेत्याचा भाजपला टोला  



मुंबई : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपला केवळ एका जागेवर यश मिळालं असून पुणे आणि नागपूरची जागा भाजपचा बालेकिल्ला म्हणून समजली जात होती. या जागावंरही महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. रोहित पवार यांनी विजय उमेदवारांचं अभिनंदन करणारं एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी भाजपलाही खडेबोल सुनावले आहेत."भाजपच्या पुणे, नागपुरच्या बुरुजालाही सुरुंग लावत महाविकास आघाडीने विजय प्राप्त केला. आता तरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रमाणिक काम करावं", असा खोचक सल्ला  रोहित पवार यांनी दिला आहे.



"भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तर महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेवून भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली आहे", असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies