स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा दोघांनाही सर्वोच्च न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा दोघांनाही सर्वोच्च न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस

 स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा दोघांनाही सर्वोच्च न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीसमुंबई : न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांच्याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दोघांनाही नोटीस बजावली आहे.कुणाल कामरानं अर्णब गोस्वामींना जामीन दिल्यानंतर एक ट्विट केलं. त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. तर रचिता तनेजानं काढलेल्या व्यंगचित्रातून न्यायालयाचा अवमान झाल्याचं सांगत अवमान खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. दोघांविरुद्ध अवमान खटला चालवण्यास अॅटर्नी जनरल के. वेणुगोपाल यांनी परवानगी दिली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोघांनाही सहा आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments