भीषण अपघात ; पंढरपूरमध्ये अपघातात पत्नीचा मृत्यू तर,पती गंभीर जखमी

भीषण अपघात ; पंढरपूरमध्ये अपघातात पत्नीचा मृत्यू तर,पती गंभीर जखमी

 भीषण अपघात ; पंढरपूरमध्ये अपघातात पत्नीचा मृत्यू तर,पती गंभीर जखमीपंढरपूर : चंद्रभागेच्या परिसरात पहाटे फिरण्यासाठी अनेकजण येतात. पंढरपूरच्या नवीन पुलावर चारचाकी वाहनाने एका दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला जोरात धडक दिल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. यात दुचाकीवर स्वार असलेल्यांपैकी पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला. आज पहाटे जयश्री व प्रकाश बारले हे या परिसरात फिरण्यासाठी गेले होते. हे दोघे नंतर त्यांच्या दुचाकीवरून नवीन दगडी पुलावरून घराकडे जात होते. वाहन जोराने आले आणि समोरून येणार्याद पती-पत्नीच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत त्या अवजड वाहनाने पती-पत्नींना पन्नास ते साठ फूट घसरत नेले. यामध्ये जयश्री बारले यांचा जागीच मृत्यू झाला. पती प्रकाश बारले हे या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments