“रावसाहेब दानवेंचे ते विधान पोरकटपणाचे” : उपमुख्यमंत्री

“रावसाहेब दानवेंचे ते विधान पोरकटपणाचे” : उपमुख्यमंत्री
 “रावसाहेब दानवेंचे ते विधान पोरकटपणाचे” : उपमुख्यमंत्रीमुंबई : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनचा हात आहे,' हे रावसाहेब दानवेंचे विधान पोरकटपणाचे आहे, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. अशी विधाने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केली जात आहेत, असेही पवार म्हणाले. दानवे यांच्या विधानाचा अजित पवार यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, "अनेक वर्ष खासदार आणि मुख्य पदावर असणारे दानवे यांचं वक्तव्य योग्य नाही.'जय जवान जय किसान' चा नारा आदराने घेतला जातो. शेतकऱ्या समोर अडचण निर्माण होते तेव्हा तो रस्त्यावर उतरतो. शेतकऱ्यांबाबत जनता आपलेपणाची भावना दाखवते. शेतकरी आंदोलनाशी चीन आणि पाकिस्तानचा काय संबंध? दानवे हे शेतकरी कुटुंबातले आहेत. अशा व्यक्तीने शेतकरी कुटुंबाविषयी बोलणं योग्य नाही. याचा मी निषेध करतो. दानवेंचे विधान अर्थहीन आहे. त्याला महत्त्व देण्याचं कारण नाही. शेतकरी लाखांचा पोशिंदा आहे. त्याला मदत झालीच पाहिजे. याबाबत केंद्राने हटवादी भूमिका घेणे योग्य नाही. एनडीए मधील घटक पक्ष केंद्र सरकार पासून बाजूला गेले. अनेक जण आपले पुरस्कार परत करत आहेत. अशा अनेकांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. शेतकरी कामाचं मोल मागतात त्यात काही चूक नाही,''


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a comment

0 Comments