ICC ने केला दशकाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून या भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेटपटूची निवड

ICC ने केला दशकाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून या भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेटपटूची निवड
 ICC ने केला दशकाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून या भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेटपटूची निवड नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दशकाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. या दशकात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात कोहलीच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने त्याला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार म्हणजेच गौरव केला आहे. एकूण चार गटातील पुरस्कारासाठी त्याला नामांकन मिळाले होते. दशतकातील सर्वोत्तम खेळाडू, दशकातील सर्वोत्तम टेस्ट खेळाडू आणि दशकातील सर्वोत्तम वन-डे खेळाडू, दशकातील सर्वोत्तम टी-20 खेळाडू अशा चार गटात विराटला नामांकन मिळालं होतं. त्यापैकी दोन पुरस्कार विराटला मिळाले आहेत. यापूर्वी विराटचा दशकातील तीन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम टीममध्ये समावेश करण्यात आला होता. तीन्ही टीममध्ये समावेश झालेला विराट हा एकमेव खेळाडू आहे.

Post a comment

0 Comments