Type Here to Get Search Results !

कोरोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 1 ते 31 डिसेंबरपर्यंत दिशानिर्देश जारी




 कोरोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून  1 ते 31 डिसेंबरपर्यंत दिशानिर्देश जारी 



नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. अद्याप कोरोना संसर्गाचा धोका दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासारख्या राज्यात कायम असून केंद्रीय गृहमंत्रालयाने अशा परिस्थितीत 25 नोव्हेंबर रोजी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. आजपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काही प्रतिबंध लागू करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दिल्या आहेत. 1 ते 31 डिसेंबरपर्यंत हे दिशानिर्देश लागू असणार आहेत.






असे आहेत केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेले नवे दिशानिर्देश



सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक

सोशल डिस्टेंसिंग गरजेचे

वारंवार हात धुणे आवश्यक

५० टक्के प्रेक्षकांना चित्रपटगृहात परवानगी

फक्त खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी जलतरण तलाव सुरु राहतील

मोकळ्या मैदानात धार्मिक कार्यक्रम, खेळ यासाठी 200 जणांना परवानगी

100 जणांना बंद मोठ्या सभागृहात परवानगी

आंतराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरु

राज्याअंतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीवर बंधन नाही

फक्त बिझनेस टू बिझनेस हेतूने प्रदर्शने सुरु






कोरोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हे दिशानिर्देश जारी केले आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवल्या उपाययोजनांचे पालन आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सांगितले आहे. तसेच स्थानिक परिस्थितीनुसार राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश रात्री संचारबंदीसारखे नियम लागू करु शकतात, असेही राज्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने सूचित केले आहे.





देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर त्यासाठी आता केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असेल. बुधवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. तर केवळ अत्यावश्यक सेवांना कंटेन्मेंट झोनमध्ये परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. तसेच राज्यातील कंटेन्मेंट झोनची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावी, असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies