ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना व्हायरसबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा दिलासा

ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना व्हायरसबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा दिलासा
 ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना व्हायरसबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा दिलासा 
लंडन : ब्रिटनमध्ये नव्याने आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने , (डब्ल्यूएचओ) या नवीन व्हायरसशी संबंधित एक नवी गोष्ट सांगितली आहे. डब्ल्यूएचओचे एमरजन्सी चीफ माईक रायन यांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या साथीत असा नवा स्ट्रेन मिळणे, ही एक सामान्य बाब आहे, पण तो अनकंट्रोल आहे, असं नाही. पण या आधी ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी या नव्या व्हायरससाठी अनकंट्रोल हा शब्द वापरला होता.कालपासून ग्रेट ब्रिटनच्या प्रवासावर जगातील जवळ जवळ बहुतेक देशांनी बंदी लावली आहे. ब्रिटनहून प्रवासाला आतापर्यंत ४० देशांनी बंदी लावली आहे. यात युरोपातील संघ एक कॉमन पॉलिसी बनवण्यावर विचार करीत आहे. व्हायरसचा एक नवा जास्त वेगाने संक्रमण फैलावणारा आहे, पण तो अनकंट्रोल आहे, असं नाही. तो कंट्रोल होण्यासारखा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या नव्या व्हायरसविषयी जे म्हटलं आहे, त्यावरुन घाबरण्याचं कारण नाही. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a comment

0 Comments