भाजपच्या या आमदाराच्या कारला भीषण अपघात ; बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु

भाजपच्या या आमदाराच्या कारला भीषण अपघात ; बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु
 भाजपच्या या आमदाराच्या कारला भीषण अपघात ; बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु कल्याण : भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. कल्याण तालुक्यातील दहागावजवळ रविवारी रात्री ही घटना घडली होती.  भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीने एका दुचाकीला समोरून जोरात धडक दिली होती. भरधाव वेगात असल्यामुळे दोन्ही वाहनांनी समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कथोरे यांच्या कारची एअर बॅग सुद्धा फुटली. कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. यात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.अमित नंदकुमार सिंग असं या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्यासोबर सिमरन सिंग नावाची तरुणी गंभीर जखमी झाली होती. दोघेही जण कल्याण ग्रामीणमधील पिसवली परिसरातील रहिवासी होते. जखमी अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, रात्री उशिरा उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. तर या अपघातात आमदार कथोरे जखमी झाले आहेत. कथोरे यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या अपघातात आमदार कथोरे जखमी झाले आहेत. कथोरे यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments