Type Here to Get Search Results !

“मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे पुढे जातात, तसे दानवे पुढे आले आहेत” : माजी आमदार हर्षवर्धन जाधव








 “मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे पुढे जातात, तसे दानवे पुढे आले आहेत” : माजी आमदार  हर्षवर्धन जाधव



औरंगाबाद : शेतकरी विरोधातील विधानावर माफी मागावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवाजी नगर येथील जलकुंभावर गुरुवारपासून आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी दुपारी आंदोलनस्थळी रावसाहेब दानवे यांचे जावई तथा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली. 



रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य आहे. मागे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे तर आता नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादावर ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे मोठे होतात तसेच ते पुढे आले आहेत. यामुळे सत्ता कधीच जाणार नाही या अविर्भावात त्यांचे वर्तन असते. यातूनच त्यांचे शेतकरी विरोधातील विधान असून त्यांनी शेतकऱ्यांची तत्काळ माफी मागावी अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शुक्रवारी दुपारी प्रहारच्या जलकुंभावरील ठिय्या आंदोलनस्थळी भेट देऊन केली. 



जाधव म्हणाले, केंद्रीय मंत्री असलेल्या जबाबदार व्यक्तीकडून असे वक्तव्य होणे चुकीचे आहे. आंदोलन सुरु असताना कुठल्याही केंद्रीय मंत्र्यांनी नेमकी अडचण काय आहे हे जाणून घेऊन सरकार आणि आंदोलकांमधील दुआ म्हणून काम करावे. मात्र, हे सोडून शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनचे हस्तक संबोधणे म्हणजे गावगुंडांप्रमाणे केलेले अक्कल शून्य व्यक्तव्य आहे. देशाला ज्यांनी सावरले त्या शेतकऱ्यांची दानवे यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणीही जाधव यांनी केली. 



रावसाहेब दानने यांचे कर्तुत्व पूर्णपणे शून्य आहे. आधी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि आता प्रधानमंत्री मोदी यांच्यामुळे ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे पुढे जातात तसे दानवे पुढे आले आहेत. अशी टीकाही जाधव यांनी यावेळी केली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies