सरकारने तेथून येणारी हवाई वाहतूक ताबडतोब बंद करावी : पृथ्वीराज चव्हाण

सरकारने तेथून येणारी हवाई वाहतूक ताबडतोब बंद करावी : पृथ्वीराज चव्हाण

 सरकारने तेथून येणारी हवाई वाहतूक ताबडतोब बंद करावी : पृथ्वीराज चव्हाणनवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली असली तरी दररोज आढळणारे नवे रुग्ण व बळींची संख्या कमी होत आहे. प्रसिद्ध विषाणूजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी सांगितले की, देशात नोंदविल्या गेलेल्या रुग्णांपेक्षा प्रत्यक्षात १६ पट अधिक आहेत, असे दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे देशात खरे तर १६ कोटी रुग्ण आहेत, असे म्हणता येऊ शकते. इतक्या रुग्ण असल्याने व त्यांची प्रतिकारक्षमताही वाढल्याने संसर्गाची साखळी अनेक ठिकाणी तुटली आहे. त्यामुळे दुसरी लाट आलीच तरी फार गंभीर असणार नाही. मात्र, अद्यापही कोरोनाच धोका असल्याने लोकल, शाळा आणि काही आस्थापने बंदच आहेत. दरम्यान, कोरोना हा चीनमधून जगभर पसरला आहे, भारतातही विदेशातूनच कोरोनाचा प्रसार झाला. त्यामुळे, अतिदक्षता घेण्यासाठी आता युके ते भारत हवाई प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याची सूचना माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण  यांनी मांडली आहे. ''विषाणूच्या नव्या प्रकारामुळे युकेमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. सरकारने तेथून येणारी संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोक स्थगित केली पाहीजे.'', असे ट्विट चव्हाण यांनी केलं आहे. विशेष म्हणजे लंडनमध्ये सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे,  भारत सरकारनेही याचा गांभीर्याने विचार करायला हवा.

 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

 Post a comment

0 Comments