''यदा कदाचित'' नाटकाच्या निर्मात्याचे हृदयविकाराचा झटक्याने निधन

''यदा कदाचित'' नाटकाच्या निर्मात्याचे हृदयविकाराचा झटक्याने निधन
 ''यदा कदाचित'' नाटकाच्या निर्मात्याचे हृदयविकाराचा झटक्याने निधनठाणे : ''यदा कदाचित'' नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे आज निधन झाले. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर ठाणे, महागिरी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
''यदा कदाचित'' हे नाटक महाराष्ट्रात चांगलेच गाजले होते. अचानक रात्री दत्ता घोसाळकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. आज दुपारी १२ व जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा यदा कदाचित रिटर्न हे नाटक २६ डिसेंबर पासून रंगभूमीवर येणार होते. कोरोनानंतर त्याचा पहिला प्रयोग होणार होता. तसेच त्यांचे दोन प्रोजेक्टवर काम सुरू होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a comment

0 Comments