भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील सराव सामना अनिर्णीत ; ऑस्ट्रेलिया कडून बेन मॅकडर्मोट आणि जॅक वाइल्डरमुथ यांची शतके

भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील सराव सामना अनिर्णीत ; ऑस्ट्रेलिया कडून बेन मॅकडर्मोट आणि जॅक वाइल्डरमुथ यांची शतकेभारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील सराव सामना अनिर्णीत ; ऑस्ट्रेलिया कडून बेन मॅकडर्मोट आणि जॅक वाइल्डरमुथ यांची शतके


सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्या दरम्यान झालेला दुसरा सराव सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. भारताने पहिल्या डावात १९४ आणि दुसऱ्या डावात चार बाद ३८६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला १०८ धावात गुंडाळत सामन्यावर पकड मिळवली असे वाटत होते. परंतु दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया अ संघातील फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार करत तिसऱ्या दिवसाखेर चार बाद ३०७ धावा केल्या.
भारताकडून हनुमा विहारी आणि पंत यांनी शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलिया अ संघाकडून बेन मॅकडर्मोट (नाबाद १०७ धावा) आणि जॅक वाइल्डरमुथ (नाबाद १११ धावा) करून परतले. पहिल्या दिवशी दोन्ही संघाच्या २० विकेट पडल्या होत्या. दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं आपलं वर्चस्व गाजवलं तर तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया अ संघानं वर्चस्व गाजवले.


दुसरा सराव सामना अनिर्णित राहिला असला तरीही भारतीय संघासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. पहिल्या सराव सामन्यात साहानं अर्धशतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या सराव सामन्यात पंतने शतकी खेळी केली. साहा आणि पंत यांनी फलंदाजी करत संघातील आपली दावेदारी सिद्ध केली आहे. त्यामुळे आता पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला संधी मिळणार हा पेच कायम आहे.  


त्याच बरोबर मयांकसोबत सलामीला गिल की पृथ्वी शॉ यांच्यापैकी कोण येणार? हा पेचही कायम आहे. बुमराह-शामीच्या जोडीला तिसरा वेगवान गोलंदाज उमेश यादव, सैनी आणि सिराज यांच्यापैकी एकाला स्थान मिळणार आहे.


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments