राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय

 राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय मुंबई : सर्व शासकीय, खाजगी शिक्षण संस्थांमध्ये असलेली शिपायांची पदे भरण्यात येणार नाहीत. राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात भविष्यातील  शिपायांच्या सुमारे ५२ हजार नोकऱ्यांवर पाणी पडणार आहे. सध्या कार्यरत असलेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे रद्द होतील. नवीन भरतीऐवजी शाळांना ठोक स्वरुपात शिपाई भत्ता दिला जाणार आहे. यात शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाईगार, कामाठी, तेलवाला, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर यांचा समावेश आहे. यापुढच्या काळामध्ये रिक्त पदे न भरता गरज असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या मानधन तत्वावर शिपाई दिला जाणार आहे. त्यामुळे एकप्रकारे खासगीकरण सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments