आटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात

आटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यातआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात 

माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी : आटपाडी येथील सोमनाथ जाधव यांच्या अवघ्या सहा महिन्याच्या बकऱ्याला तब्बल 16 लाख इतका दर आला होता. उच्चांकी दरामुळे मोदी बकरा आणि त्याचे पिल्लू हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात प्रसिद्ध झाले. त्यांचा हा 16 लाख रुपयांचा बकरा शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलिशान चारचाकी वाहनातून चोरून नेण्यात आला. या घटनेने आटपाडी शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. 


परंतु पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरवत तपास केल्याने या बकऱ्याची चोरी उघड झाली असून पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बकरा ताब्यात घेण्यात आला आहे. 


सविस्तर बातमी लवकरच 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a comment

0 Comments