‘समझनेवाले को इशारा काफी है!’ : “या” शिवसेना नेत्याचे भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज
‘समझनेवाले को इशारा काफी है!’ : “या” शिवसेना नेत्याचे भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज


मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्य बजावले असून वर्षा राऊत यांना आता 5 जानेवारीला ईडीसमोर हजर व्हावे लागणार आहे. त्यावरून राज्यातील राजकरण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी भाजपला आता ट्वीट करून ओपन चॅलेंज दिले आहे. गोदी मीडियामधील कमळे अचानक फुलायला लागली आहेत. खास करून माझ्या कुटुंबाला ईडीची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यावर. जनतेला माहीत आहे, की राजकीय पोपट कसे राजकीय हेतूसाठी वापरले जातात. माझ्या कुटुंबाचे नाव पीएमसी आणि एचडीआयएल स्कॅममध्ये विनाकरण गोवण्यात आल आहे. मी त्यांना आव्हान देतो की पुराव्यानिशी ते सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर करवाईला तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है!’, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज दिले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

Previous Post Next Post