बॉलिवूडच्या या प्रसिध्द अभिनेत्रीला कोरोनाची लागण

बॉलिवूडच्या या प्रसिध्द अभिनेत्रीला कोरोनाची लागण

 बॉलिवूडच्या या प्रसिध्द अभिनेत्रीला कोरोनाची लागण मुंबई : राजकारणातील अनेक बड्या नेत्यांसह बऱ्याच सेलिब्रेटीना कोरोनाची लागण झाली होती. आता बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नुकताच रकुलने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली आहे. रकुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. मला कोणताही त्रास होत नाही आणि मी सध्या आराम करत आहे. मी लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरु करेन’ असे रकुलने पोस्टमध्ये म्हटले आहे.पुढे ती म्हणाली, ‘माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करते की तुम्ही देखील कोरोना चाचणी करुन घ्या. तुम्हा सर्वांचे आभार आणि तुम्ही काळजी घ्या.’


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments