या प्रसिध्द अभिनेत्रीने केली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रार्थना

या प्रसिध्द अभिनेत्रीने केली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रार्थना

 या प्रसिध्द अभिनेत्रीने केली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रार्थना

मुंबई : नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी सध्या आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला महाआघाडी सरकार तसेच अनेक नेत्यांसह सेलेब्रिटीनीही पाठींबा दिलेला आहे. दरम्यान त्यांच्या या मागणीला अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी देखील पाठिंबा दिला आहे. हे देवा तू या योद्ध्यांना सुरक्षित ठेव अशी प्रार्थना शेतकऱ्यांसाठी करत ट्वीट केले आहे.

  “आपण आरामात आपल्या घरांमध्ये बसलोय अन् आपले शेतकरी अस्तित्वासाठी आणि अधिकारांसाठी या कडाक्याच्या थंडीत युद्ध लढत आहेत. त्यांची ही स्थिती पाहून त्रास होतो. हे देवा या सर्व योद्ध्यांची काळजी घे त्यांना सुरक्षित ठेव.” अशा आशयाचं ट्विट करत सिमी ग्रेवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments