“केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतले तीन पक्ष एकत्र” : उदयनराजे भोसले

 
“केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतले तीन पक्ष एकत्र” : उदयनराजे भोसले


सातारा : सत्तेच्या स्वार्थासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत अशी टीका भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. सातारा येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राची पाहणी करताना महाविकास आघाडीवर टीका केली आहे.


“केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतले तीन पक्ष एकत्र आले आहेत. केवळ सत्ता मिळवणं हाच त्यांच्या एकत्र येण्याचा हेतू आहे. लोकांची दिशाभूल करुन हे सरकार स्थापन करण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही. तसंच भाजपाची सत्ता लवकरच येणार” असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

Previous Post Next Post