अभिनेत्री कंगना राणौत आणि अभिनेता दिलजित दोसांज यांच्यात ट्विटयुध्द

अभिनेत्री कंगना राणौत आणि अभिनेता दिलजित दोसांज यांच्यात ट्विटयुध्द
 

अभिनेत्री कंगना राणौत आणि अभिनेता दिलजित दोसांज यांच्यात ट्विटयुध्द मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत आणि अभिनेता दिलजित दोसांज यांच्यात ट्विटरवर शेतकरी आंदोलनावरून शीतयुद्ध रंगलंय. ‘आज हैदराबादमध्ये बारा तास काम केल्यानंतर संध्याकाळी मी चेन्नईला एका कार्यक्रमासाठी जाणार आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मी कशी दिसतेय?’, असं ट्विट करत ‘दिलजित कित्थे आ’ (दिलजित कुठे आहे) हा हॅशटॅग तिने जोडला. ट्विटरवर प्रत्येकजण त्याला शोधत आहे, असं ती पुढे म्हणाली.

 कंगनाच्या या ट्विटला दिलजितनेही अगदी मजेशीर उत्तर दिले आहे. कंगनाचा उल्लेख न करता दिलजितने त्याचे दिवसभराचे वेळापत्रकच ट्विटरवर सांगितलं. ‘सकाळी उठल्यानंतर मी जिममध्ये व्यायाम केला. त्यानंतर दिवसभर काम आणि मग रात्री झोपी गेलो’, असं उपरोधिक ट्विट त्याने केलं.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments