कोरोना लसीबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मोठी घोषणा

कोरोना लसीबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मोठी घोषणा
कोरोना लसीबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मोठी घोषणामुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे.कोरोना व्हॅक्सिनची सगळ्यांना प्रतिक्षा असताना रामदास आठवले यांनी दावा केला आहे की, COVID-19 व्हॅक्सिन पुढील एक-दोन महिन्यात देशात उपलब्ध होईल. आता कोरोना लशीची खूप वाट पहावी लागणार नाही.रामदास आठवले म्हणाले, 'मी 20 फेब्रुवारीला 'गो कोरोना गो'चा नारा दिला होता आणि देशभरातील कोरोनाचा प्रसार कमी झाला. कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत. कोरोना पुढील 6-7 महिने राहिल. नंतर मात्र त्याला हद्दपार व्हावंच लागेल.' देशभरात कोरोना विषाणूचं संक्रमण झाल्यानंतर सोशल मीडियावर 'गो कोरोना गो' असा मंत्र देऊन रामदास आठवले यांचा नारा प्रचंड व्हायरल झाला होता.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments