ज्येष्ठ हार्मोनियम आणि तबला वादक नवीन तांबट सर यांचे निधन

ज्येष्ठ हार्मोनियम आणि तबला वादक नवीन तांबट सर यांचे निधन

 ज्येष्ठ हार्मोनियम आणि तबला वादक नवीन तांबट सर यांचे निधननाशिक  : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे हायस्कूल मध्ये ज्यांनी क्राफ्ट शिक्षक म्हणून प्रदीर्घकाळ सेवा दिली. तसेच संगीत क्षेत्रातही अनेक विद्यार्थ्यांना घडविण्यात योगदान दिले. ते ज्येष्ठ हार्मोनियम आणि तबला वादक तसेच पेठे हायस्कूलचे माजी शिक्षक नवीन तांबट सर यांचे आज सकाळी 8 वाजता आजाराने निधन झाले. संगीताचे व्यासंगी असलेल्या तांबट सर यांनी ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे संगीतकार अनिल मोहिले यांच्यासह अनेक संगीतकारांसमवेत त्यांच्या कार्यक्रमांमध्ये तबल्यावर साथ संगत केली होती.अत्यंत प्रेमळ आणि लाघवी स्वभावामुळे संगीतक्षेत्रातील सर्व वयोगटातील संगीत प्रेमींचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने नाशिकचा सच्चा कला आणि संगीत प्रेमी शिक्षक हरपला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि गायिका शुभदा तांबट, मुलगा निनाद, कन्या आणि सून असा परिवार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments