सायकलवर केले पंढरपूर दर्शन ; संपर्कातून 41 गावकऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह : 8 दिवसांसाठी ठेवले गावच बंद
नाशिक : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र हाहाकार माजला असून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावच्या 24 जणांनी सायकलने पंढरपूर गाठले होते. 14 डिसेंबर रोजी त्यांनी पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतलं होतं. पंढरपूरहुन आल्यानंतर 24 जणांना कोरोनाची लागण झाली होती.
ही सर्व लोकं गावात आल्यानंतर अनेकांच्या संपर्कात आले होते. अनेक ठिकाणी या 24 जणांचा स्वागत आणि सत्कार समारंभही झाला. मात्र यातील काही जणांमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली. त्यामुळे तपासणी केली असता हे सर्व पॉझिटिव्ह आढळून आले. धक्कादायक म्हणजे या 24 जणांच्या संपर्कात आल्याने तब्बल 41 गावकऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. या घटनेने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. खबरदारी म्हणून संपूर्ण गाव पुढील 8 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
गावात एकावेळी मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे पुन्हा कोरोनाची लाट पसरण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे गावातील गावकऱ्यांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. महत्त्वाचे काम जर असेल तर घराबाहेर पडावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
0 Comments