Type Here to Get Search Results !

“महाविकास आघाडीची सत्ता नसती तर”...

 



“महाविकास आघाडीची सत्ता नसती तर”... 





कोल्हापूर : “महाविकास आघाडीची सत्ता नसती तर जयंत पाटील भाजपात येणार होते. त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चादेखील झाली होती. जयंत पाटील यांना मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उत्तर देणार आहे. त्यांच्याबाबत जी माझ्याकडे माहिती आहे, ती मी तिथेच जाऊन उघड करणार आहे. पुढचं सरकार आमचंच येणार असं जयंत पाटील सातत्याने म्हणत आहेत. कदाचित पुढील सरकारमध्येही मी मंत्री असेन असं त्यांना म्हणायचं असेल, असं राणे म्हणाले होते.





आज पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एक पत्रकाराने त्यांना, जयंत पाटील खरंच भाजपामध्ये येणार आहेत का? असा प्रश्न विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सूचक उत्तर दिलं. “मी इतका सामान्य माणूस आहे की वरच्या स्तरावर नक्की काय चर्चा चालतात याबद्दल मला काहीही माहिती नसतं”, असं उत्तर देऊन त्यांनी प्रश्नाला बाजू दिली.






Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies