“आम्हाला विश्वास आहे मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार” : भाजपा नेते राम कदम
 “आम्हाला विश्वास आहे मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार” : भाजपा नेते राम कदममुंबई : हैदराबाद महानगरपालिकेच्या १५० जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये पहिल्या क्रमांकावर टीआरएस. दुसऱ्या क्रमांकावर भाजप तर तिसऱ्या क्रमांकावर असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आहे. निकालांनंतर त्रिशंकू परिस्थितीत निर्माण झाली असली तर भाजपनं मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, निकालानंतर भाजपा नेते राम कदम यांनी मुंबई महानगरपालिकेवरदेखील भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बिहारमध्ये विजय मिळवला. त्यानंतर भाजपला हैदराबादमध्ये ज्या प्रकारचं यश मिळालं त्यावर देशातील जनतेला पंतप्रधानांच्या नेतृत्वावर किती विश्वास आहे हे दिसून येतंय. लोकांनी विकासाला स्वीकारलं आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मुंबई महानगरपालिकेवरदेखील भाजपचाच भगवा फडकणार,” असं राम कदम म्हणाले.“शिवसेनेच्या ३० वर्षांच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. कोरोना काळातही जो निष्काळजीपणा करण्यात आला तो लोकांच्या लक्षात आहे. आम्हाला विश्वास आहे मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार,” असंही त्यांनी नमूद केलं.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured