‘आम्हाला कुणी बिन कामाचा सल्ला देण्याची काहीही आवश्यकता नाही’ : उपमुख्यमंत्री
 ‘आम्हाला कुणी बिन कामाचा सल्ला देण्याची काहीही आवश्यकता नाही’ : उपमुख्यमंत्रीपुणे : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुका पार पडल्या. यात महाविकास आघाडीने भाजपाला अनेक ठिकाणी चितपट केले होते. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एक एकट्याने आमच्याशी लढावे असे खुले आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्याला आता राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटलांनाच खडे बोल सुनावले आहे.  अजित पवार म्हणाले, आम्ही आघाडी करून लढायचे की एक एकट्याने या संबंधीचा निर्णय आघाडीतील सहभागी पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील. आम्हाला कुणी बिन कामाचा सल्ला देण्याची काहीही आवश्यकता नाही. एकत्रितपणे लढण्याचे परिणाम या निवडणुकीच्या निकालातून समोर आले आहे. सर्वच मतदारसंघात आघाडीतील पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी एकत्रित पणे काम केले. त्यामुळे पुढील काळात अधिकाधिक आघाडीचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या वेगळे लढण्याने जर विरोधकांचा फायदा होणार असेल तर तसे अजिबात होता कामा नये. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

Previous Post Next Post