“जेव्हा त्यांना काही काम नसते तेव्हा ते अशी ट्वीट करत असतात” : फडणवीस

“जेव्हा त्यांना काही काम नसते तेव्हा ते अशी ट्वीट करत असतात” : फडणवीस
 “जेव्हा त्यांना काही काम नसते तेव्हा ते अशी ट्वीट करत असतात” : फडणवीसमुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटवर माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खोचक टोला मारला आहे. संजय राऊतांमध्ये प्रतिभा खूप आहे. त्यांना अनेक गाणी, शेर पाठ आहेत. जेव्हा काही काम नसते तेव्हा ते अशी ट्वीट करत असतात, अशी टिका फडणवीसांनी केली.ही ईडीची नोटीस का आली हे तुम्ही ईडीला विचारले पाहिजे. कारण मी ईडीचा प्रवक्ता नाही. चांगले काम केले तर कुणाला नोटीस येत नाही. जर काही चुकीचे घडले नसेल तर नोटीसला नीट उत्तर देता येते, असे फडणवीस म्हणाले. ईडीची नोटीस आल्यावर संजय राऊत यांनी ट्विट केले. 'आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया', अशा ओळी त्यांनी ट्विट केल्या. यातून त्यांनी ईडीच्या कारवाईला थेट आव्हान देण्याची भूमिका घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचबरोबर शिवसेनेच्या 'आली अंगावर तर घ्या शिंगावर' या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका राऊत यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. त्यावर फडणवीस यांनी निशाणा साधला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments