पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू होणार कि नाही? : शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
 पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू होणार कि नाही? : शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती मुंबई : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील काही जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. सुदैवाने कोरोनाचा कोणत्याही प्रकारच्या प्रार्दुभावाने विद्यार्थी व शिक्षक संक्रमित झाले नाही ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसारच राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.शिक्षण मंत्री पुढे म्हणाल्या, शाळा सुरू करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेण्यात येईल. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा विचार करता येईल . केंद्र व राज्य शासनाच्यावतीने जाहीर केलेल्या आरोग्य विषयक सूचनांचे पालन करूनच नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील, कारण हे विद्यार्थी प्राथमिक विभागातील मुलांपेक्षा अधिक जागरूक व सजग असतात.लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक सुचनांचे पालन करणे तितकेसे सहज शक्य नसल्याने निदान सध्या तरी आम्ही पहिली ते आठवी पर्यंतच्या प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही भूमिका मांडली नाही. कोरोनाच्या पार्श्वचभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा व आरोग्य विषयक बाबींचा विचार करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हीत लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल अशी माहितीही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

Previous Post Next Post