Type Here to Get Search Results !

चिंताजनक : पुण्यात इंग्लंडमधून आलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

 



चिंताजनक : पुण्यात इंग्लंडमधून आलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह



पुणे : पुण्यातील इंग्लंडमधून प्रवास करून परतलेल्या एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य आधिकाऱ्यानं दिली आहे. त्या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर अशून, त्याची कोरोनाच्या विषाणूची स्ट्रेन इंग्लंडमध्ये उद्रेक झालेल्या विषाणूंशी मिळती-जुळती आहे का, हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे महानगर पालिकेचे सहायक मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.



२५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान युरोप आणि मध्यपूर्व आशियातून राज्यात ५४४ नागरिक आले आहेत. त्यापैकी ३०० प्रवासी पुण्यातील असून, त्यांचा शोध लागला आहे. या सर्वांना घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वावरे यांनी दिली.



ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवीन दोन प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे सगळ्या देशांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनमधून येणारी विमानंही थांबवण्यात आली आहे. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचं संक्रमण सुरू असतानाच पुण्यात परतलेल्या एका व्यक्तीमुळे खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाला कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याने घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies