नवीन वर्षाच्या मुहूर्तावर “या” नेत्याचा होणार राष्ट्रवादीत प्रवेश

नवीन वर्षाच्या मुहूर्तावर “या” नेत्याचा होणार राष्ट्रवादीत प्रवेश
 नवीन वर्षाच्या मुहूर्तावर “या” नेत्याचा होणार राष्ट्रवादीत प्रवेशपुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक जण आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड शहरातील देखील अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे चित्र निर्माण झाले. त्याची सुरुवात नवीन वर्षाच्या प्रारंभीच महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे हे समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेशाने करणार आहेत.भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, संतोष बारणे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता संतोष बारणे खरचं राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहे. संतोष बारणे हे माजी विरोधी पक्षनेते असले तरी त्यांच्या पत्नी माया बारणे या भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका आहेत, त्यामुळे बारणे यांच्या प्रवेशाला महत्त्व आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments