Type Here to Get Search Results !

पंजाब संघाकडून खेळणारा अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू मुजीब उर रेहमानला कोरोनाची लागण




पंजाब संघाकडून खेळणारा अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू मुजीब उर रेहमानला कोरोनाची लागण



मुंबई : आयपीएलमधील पंजाब संघाकडून खेळणारा अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू मुजीब उर रेहमानला कोरोनाची लागण झाली आहे. बीग बॅश लीग खेळण्यासाठी मुजीब ऑस्ट्रेलियात आला होता. हॉटेलमध्ये क्वारंटनाइनमध्ये असताना मुजीबला कोरोनाची लागण झाल्याचं समजतेय.


गेल्या आठवड्यात काबूलवरुन मुजीब ऑस्ट्रेलियात आला होता. दोन आठवड्याच्या सक्तीच्या विलगीकरणामध्ये मुजीबमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. क्वारंटाइनच्या एक आठवड्यानंतर चाचणी केली असता मुजीबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार खबरदारीचा उपाय मुजीबला गोल्ड कोस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



बिग बॅश लीग खेळण्यासाठी मुजीब आफगाणिस्तानच्या इतर खेळाडूबरोबर ऑस्ट्रेलियात पोहचला होता. मुजीबनं आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटोही पोस्ट केले होते. मोहमद्द नबी, नूर अहमद आणि झहिर खान या खेळाडूसोबत मुजीबनं प्रवास केला होता. हे सर्व खेळाडू दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले होते. दक्षिण ऑस्ट्रेलियात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुजीबच्या संपर्कातील सर्व खेळाडूंनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies