Type Here to Get Search Results !

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या




 यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या





अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यात आली आहे. अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील जतेगाव येथील घाटात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली. हल्ल्यात जखमी झालेल्या रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.





पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेखा जरे आपल्या कारने अहमदनगरला येत होत्या. यावेळी हायवेवर शिरुरजवळ दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली आणि वाद झाला. यादरम्यान दुचाकीवर स्वार हल्लेखोराने धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर हल्ला केला आणि तेथून पळ काढला.






पोलीस सध्या दुचाकीस्वाकाचा शोध घेत आहेत. यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. तपासासाठी पोलीस हायवेवर असलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासून पाहत आहेत. अद्याप पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागलेला नाही. रेखा जरे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies