....मी तर जन्मापासूनच मूर्ख आहे : अभिनेत्री कंगना

 ....मी तर जन्मापासूनच मूर्ख आहे : अभिनेत्री कंगना
मुंबई : काही दिवसांपूर्वी शेहलाने कंगनाबाबत एक ट्विट केलं होतं. शेहला म्हणाली होती की, 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं हा काही निवणुकीचा मुद्दा नाहीये. याने तुम्हाला Z सिक्युरिटी किंवा पद्म भूषण मिळणार नाही. इडियट'. कंगना रनौतने यालाच उत्तर दिलं आहे.

जेएनयू छात्र संघाची माजी उपाध्यक्ष शेहला रशीदच्या वडिलांनी मुलीवर देश विरोध कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप लावला होता. यावर आता कंगना रनौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगना रनौतने शेहलाच्या वडिलांचा व्हिडीओ ट्विट करत लिहिले की, 'देशद्रोहने तुम्हाला पैसा, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मित्र, सहयोग सगळं काही मिळेल. पण देशप्रमाने तुम्हाला वैरी मिळतील, संघर्ष मिळेल, पूर्वजांची सभ्यतेची लढाई मिळेल, तुमचं जीवन आहे तुमचा निर्णय असला पाहिजे, समजदारीचं जीवन जगायचंय की मूर्खतेचं? ....मी तर जन्मापासूनच मूर्ख आहे'.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments