साई संस्थानाकडून लावण्यात आलेल्या वादग्रस्त फलकाविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार म्हणाले...

साई संस्थानाकडून लावण्यात आलेल्या वादग्रस्त फलकाविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार म्हणाले...मुंबई : शिर्डी देवस्थानकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या ड्रेसकोडसंबंधी एक फलक लावण्यात आला होता. मात्र या नियमावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाच्या फलकाविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या होत्या. यादरम्यान साई संस्थानाकडून लावण्यात आलेल्या वादग्रस्त फलकाविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. साई मंदिरात येताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन शिर्डीतील साई संस्थानने केले आहे. यावर पवार म्हणाले, “साई संस्थानने मंदिर परिसरात पेहरावा संबंधिच्या नियमाचे फलक लावले आहेत. रोहित पवार म्हणाले की, मंदिरात जाताना कोणते कपडे घालावेत, हे आपल्या देशाची संस्कृती सांगते. लोकांना ही गोष्ट कळते. मात्र, तरीही आपण मंदिरात फलक लावणार असू तर ती गोष्ट योग्य नाही”, असं म्हणत अप्रत्यक्षपणे साई संस्थानवर टीका केली आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a Comment

Previous Post Next Post