आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल १६८ उमेदवार रिंगणातआटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल १६८ उमेदवार रिंगणात

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०/२१ साठी आटपाडी तालुक्यातील एकूण १० ग्रामपंचायत साठी निवडणूक होणार असून यातील पात्रेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून बाकी ९ ग्रामपंचायतसाठी निवडणूक लागली आहे. यामध्ये बोंबेवाडी ग्रामपंचायतीच्या ७ जागांपैकी ६ जागा बिनविरोध झाल्या असून १ जागेसाठी निवडणूक लागली आहे. तर धावडवाडी ग्रामपंचायतीच्या ७ जागा जागा पैकी ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. लेंगरेवाडी व देशमुखवाडी ग्रामपंचायतीची प्रत्येकी १ जागा बिनविरोध झाली आहे.


 • ग्रामपंचायत जागा   उमेदवार बिनविरोध
 • विठ्ठलापुर ०९ ३३ ००
 • घरनिकी ११ २४ ००
 • धावडवाडी ०७ ०४ ०५
 • पात्रेवाडी ०७ ०० ०५
 • देशमुखवाडी ०७ १२ ०१
 • शेटफळे १३ ३७ ००
 • बोंबेवाडी ०७ ०२ ०६
 • तळेवाडी ०९ १९ ००
 • लेंगरेवाडी ०९ १७ ०१
 • माडगुळे ०९ २० ००
 • एकूण ८८ १६८ १८


एकूण ९ ग्रामपंचायतीच्या ८८ जागेसाठी १६८ उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले असून अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी १२३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले तर १८ जागा ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a Comment

Previous Post Next Post