सर्वसामन्यांच्या खिशाला मोठा फटका ; नव्या वर्षीच महागला सिलेंडर

सर्वसामन्यांच्या खिशाला मोठा फटका ; नव्या वर्षीच महागला सिलेंडर

 सर्वसामन्यांच्या खिशाला मोठा फटका ; नव्या वर्षीच महागला सिलेंडर नवी दिल्ली : देशातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलो सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून, १९ किलो सिलेंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. प्रत्येक राज्यातील करांनुसार, घरगुती सिलेंडरचा दर वेगवेगळा असतो. मिळालेल्या माहितीनुसार, १९ किलोच्या व्यवसायिक स्वरुपात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडर दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत १९ किलोचा एलपीजी सिलेंडर १७ रुपयांनी महाग झाला असून, आता तो १२९७.५० रुपयांना मिळेल. यापूर्वी याचा दर १२८०.५० रुपये होता. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments