महाराष्ट्र पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुख पदी आण्णासाहेब कोळी यांची निवड

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुख पदी आण्णासाहेब कोळी यांची निवडमहाराष्ट्र पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुख पदी आण्णासाहेब कोळी यांची निवड 


म्हसवड/अहमद मुल्ला : महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी नुकतीच महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी जाहीर केली यावेळी आण्णासाहेब कोळी यांची पुनश्च राज्य संपर्क प्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली.
हिंगणी तालुका, माण जिल्हा, सातारा येथील आण्णासाहेब कोळी यांनी पत्रकारिता क्षेत्रांमध्ये सलग अठरा वर्षे उत्कृष्ट पत्रकारिता करून नावलौकिक प्राप्त केलेली आहे. विविध नामांकित दैनिकामध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून योग्य काम व लिखाण यातून अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. याच बरोबर ते सध्या विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र  शासन या पदावर सुद्धा काम करीत आहेत. सोबतच त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहिलेले आहे. महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये उत्कृष्ट असे कार्य पाहत आहेत त्यामुळे त्यांना प्रशासकीय, राजकीय व सामाजिक कामकाजाचा अनुभव निश्चितच चांगल्या स्वरूपाचा आहे.
यावेळी बोलताना आण्णासाहेब कोळी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य बरोबरच इतरही राज्यांमध्ये महाराष्ट्र पत्रकार संघ उत्कृष्ट कार्य करीत आहे. पत्रकारांना एकसंघ ठेवणे, पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून देणे व पत्रकारांना संरक्षण करिता मदत करणे अशा प्रकारे पत्रकारांच्या असलेल्या विविध समस्यांवर न्याय मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र पत्रकार संघटना काम करत आहे. याचाच भाग म्हणून आम्ही महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यातील सर्व पत्रकारांना बरोबर घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी पुढे येऊन राज्यभर पुर्ण वेळ काम करणार असल्याचे आण्णासाहेब कोळी म्हणाले.
 पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्याची आवड असलेले आण्णासाहेब कोळी यांची राज्य संपर्क प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस

Post a comment

0 Comments