भडकेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध ; सुहासनाना शिंदे गटाची सत्ता

 

भडकेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध ; सुहासनाना शिंदे गटाची सत्ता


खानापूर : खानापूर घाटमाथ्याचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सुहासनाना शिंदे यांनी भडकेवाडीतील ग्रामस्थांना केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत, गावातील नागरिक,युवक , महिला भगिनी यांनी राजकीय विरोध न करता गावाच्या विकासासाठी एकत्र येत माजी जिल्हा परिषद सदस्य सुहासनाना शिंदे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत बिनविरोध निवडणूक केली.


सन २०२१/२६ ग्रामपंचायत निवडूनमध्ये भडकेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकूण सदस्य ७ पैकी ५ सदस्य बिनविरोध झाले. बिनविरोध निवड झालेल्या सदस्यानी खानापूर घाटमाथ्याचे नेते सुहासनाना शिंदे यांची भेट घेतली. यावेळी नानानी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यामध्ये संजय ज्ञानदेव पाटील, संगीता सोपान जाधव, श्रीमती शांताबाई नाथा शेंडगे व सौ. शैलजा युवराज जाधव, तानाजी संभाजी कदम यांची बिनविरोध निवड झाली. हे सर्व माजी  जिल्हा परिषद सदस्य सुहास(नाना) शिंदे यांच्या गटाचे आहेत.


यावेळी खानापूरचे नगराध्यक्ष तुषार मंडले, गटनेत्या सौ.मंगल खंडू मंडले यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय जगताप  (महाराज), बाळूतात्या जाधव, राजाराम शंकर जाधव, सुदाम शामराव जाधव, युवराज तानाजी जाधव, मधुकर बाळासो जाधव, सुशिल शिवाजी बुर्ली, रोहित प्रकाश जाधव, माजी सरपंच रायसिंग मंडले, राजेंद्र टिंगरे, राजन पवार, बलराज माने, राहुल ठोंबरे तसेच भडकेवाडीतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस

Post a Comment

Previous Post Next Post