पंतप्रधान मोदींकडून भारतीयांना नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट : पाच लाखांत होणार घराचे स्वप्न पूर्ण

पंतप्रधान मोदींकडून भारतीयांना नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट : पाच लाखांत होणार घराचे स्वप्न पूर्ण
 पंतप्रधान मोदींकडून भारतीयांना नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट : पाच लाखांत होणार घराचे स्वप्न पूर्ण नवी दिल्ली : नवीन वर्षी  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी 2022 पर्यंत देशातील बेघरांना पक्की घरे उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लाइट हाउस प्रोजेक्टचे  उद्घाटन केले. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे शहरी भागांमध्ये नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध होणार आहेत. मध्यमवर्गासाठी घरे उभारण्यासाठी देशाला नवे तंत्रज्ञान मिळाले आहे. लाइट हाउस प्रोजेक्ट देशातील घरबांधणी क्षेत्राला नवी दिशा दाखवणारे ठरतील. या प्रकल्पातंर्गत नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घरे तयार करण्यात येतील. ही घरे मजबूत आणि गरिबांसाठी आरामदायी असतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.केंद्र सरकारच्या लाईट हाऊस प्रोजेक्टसाठी त्रिपुरा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तमिलनाडू, आंध्र प्रदेश, झारखंड आणि गुजरात या राज्यांची निवड करण्यात आली आहे. हा केंद्रीय शहर मंत्रालयाचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये स्थानिक जलवायू आणि पर्यावरणाचे संरक्षण करून पक्की घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. तसेच ही घरे भूकंपरोधी असतील.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments