शिवसेनेला मोठा धक्का ; “या” नेत्याचा राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

शिवसेनेला मोठा धक्का ; “या” नेत्याचा राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

 शिवसेनेला मोठा धक्का ; “या” नेत्याचा राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश मुंबई : कोरोना काळातही राजकारण चांगलेच तापले असून या काळात टाळेबंदी व अन्य निर्बंध काढल्याने याचा फटका सर्वच नेत्यांना बसला आहे.कोरोनाचा प्रभाव ओसरताच अनेक नेत्यांनी पक्ष बदलास सुरवात केली आहे.ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंसह अनेक नेत्यांनी आपला मूळ पक्ष सोडून पक्षबदल केला आहे. आता शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनी मनसेत प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कौडगे यांचा अधिकृतपणे पक्षप्रवेश झाला.सुरुवातीच्या काळात त्यांनी नांदेडमध्ये शिवसैनिक अशी ओळख निर्माण केली होती. आता त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे नांदेडमध्ये मनसेची ताकत वाढण्यास मदत होणार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments