Type Here to Get Search Results !

ईडीचा दणका ; राऊत यांची ७२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त

 



ईडीचा दणका ; राऊत यांची ७२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त



मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची पंजाब अँड महाराष्ट्र बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी सुमारे ७२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. पीएमसी बँक घोटाळ्यात ४ हजार ३३५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास करीत आरोपींची धरपकड सुरू केली.



ईडीकडून चौकशी सुरू असताना, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. प्रवीण राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाल्याची माहिती समोर आली. ईडीच्या चौकशीत असे समोर आले की, राऊतने षडयंत्र करत ९५ कोटींची फेरफार केली. यात, पीएमसी बँकेकडून एचडीआयएलने घेतलेले कर्ज, ॲडव्हान्सचा स्रोतही बेकायदेशीर होता. प्रवीण राऊत यांना दिलेल्या पेमेंट्सच्या समर्थनार्थ कोणतीही कागदपत्रे मिळून आले नाहीत. एचडीआयएलकडून पालघर परिसरातील जमीन खरेदी करण्यासाठी हा निधी देण्यात आल्याचे समोर आले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies