सावधान : मोदी सरकारचा मोठा निर्णय ; लशीबाबत अफवा पसरवण्यांवर होणार कारवाई

सावधान : मोदी सरकारचा मोठा निर्णय ; लशीबाबत अफवा पसरवण्यांवर होणार कारवाई

 सावधान : मोदी सरकारचा मोठा निर्णय ; लशीबाबत अफवा पसरवण्यांवर होणार कारवाई 


नवी दिल्ली : कोरोना लशीबाबत अफवा किंवा चुकीची माहिती पसरवणाऱ्याविरोधात कारवाई करावी, असे आदेश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिले आहेत. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली आणि त्यावेळी त्यांनी असे निर्देश दिले आहेत.


देशात 16 जानेवारीपासून कोरोना सुरू झालं आहे. कोरोना लशींचे काही दुष्परिणाम समोर आले आहेत. लस घेतल्यानंतर काही जणांचा मृत्यूही झाला आहे. पण हे मृत्यू लशीमुळे झालेले नाहीत हे सरकारनं स्पष्ट केलं आहे. पण.अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. त्यात सोशल मीडियावर लशीबाबत अफवा पसरल्या जात आहेत. पण आता अशा लोकांची काही खैर नाही. कारण लशीबाबत अफवा पसरवण्यांबाबत मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.


भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन दोन्ही लशी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे कोरोना लशीबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्याविरोधात योग्य ती पावलं उचलवीत आणि दंडात्मक कारवाई करावी, असं त्यांनी सांगितलं आहे. Disaster Management Act 2005 आणि  Indian Penal Code, 1860 या कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी सर्व राज्यांना दिले आहेत.नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.  मोदी म्हणाले, ''भारतातील व्हॅक्सिन शास्ज्ञज्ञ, आपली मेडिकल सिस्टम, भारताची संपूर्ण प्रक्रियेबाबत संपूर्ण जगात विश्वासार्हता आहे. आपण हा विश्वास आपल्या ट्रॅक रेकॉर्डमुळे मिळवला आहे. आपल्या शास्त्रज्ञांना आणि विशेषज्ज्ञांना दोन्ही लशींबाबत खात्री पटल्यानंतरच, त्यांनी या लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशवासियांनी कोणताही प्रोपेगँडा, अफवा आणि खोट्या प्रचारापासून सावध राहिले पाहिजे"


Post a comment

0 Comments