दिलासादायक ; भारतामध्ये कोरोना लस येण्याचा मार्ग मोकळा

दिलासादायक ; भारतामध्ये कोरोना लस येण्याचा मार्ग मोकळा
 दिलासादायक ; भारतामध्ये कोरोना लस येण्याचा मार्ग मोकळानवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना लस येण्याचा मार्ग मोकळा झाला. Oxford-AstraZeneca Vaccine ही लस तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळण्यास तज्ज्ञाच्या बैठकीत परवानगी देण्यात आली. लशीबद्दल निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने याबाबतचा अहवाल दिला असून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिशील्ड लशीसाठी सशर्त परवानगी द्यायला हरकत नसल्याचं  स्पष्ट केलं आहे. ही लस भारतीयांसाठी अधिक परिणामकारक असेल असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.दिल्लीच्या मेदांता हॉस्पिटलचे संचालक डॉ. नरेश त्रेहान यांनी दिलेल्या माहितीनुसार,  “सीरम इन्स्टिट्यूट तयार करत असलेल्या लसीचं स्टोरेज 2 ते 8 डिग्री सेंटीग्रेड आहे. त्यामुळे आपण ती लस फ्रिजमध्ये ठेवू शकतो. त्याचबरोबर त्याची किंमतही कमी आहे. आपल्याला देशात 100 कोटींपेक्षा जास्त लशींची आवश्यकता आहे. या लशीची उत्पादन क्षमताही चांगली आहे. त्यामुळे ही लस आपल्यासाठी उपयुक्त आहे.’’देशात लवकरच व्हॅक्सीन ड्राईव्ह सुरु होणार आहे. त्याबाबत डॉ. त्रेहान यांनी सांगितले की, “या प्रकारची ड्राईव्ह होण्याचं हे देशातलं पहिलं उदाहरण नाही. भारतानं यापूर्वी देखील अनेक व्हायरसवर मात केली आहे. या ड्राईव्हची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. सुरुवातीला फ्रंटलाईन व्यक्तींना लस देण्यात येईल, कारण त्यांना सर्वात जास्त धोका आहे. त्यानंतर वरिष्ठ नागरिक आणि गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना लस दिली जाऊ शकते. त्यानंतर हळू-हळू अन्य व्यक्तींचा क्रमांक असेल. येत्या तीन ते सहा महिन्यांत सर्वांना मोठा दिलासा मिळेल,’’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशातील 60 ते 70 टक्के नागरिकांचे लशीकरण झाल्यानंतर योग्य प्रतिकारक्षमता तयार होईल. त्यानंतर व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता कमी होईल,’’ असंही त्रेहान यांनी सांगितले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments