Type Here to Get Search Results !

“वीज बिलाबाबत यूटर्न घेणाऱ्या ऊर्जामंत्री आणि राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा” : मनसे

 



“वीज बिलाबाबत यूटर्न घेणाऱ्या ऊर्जामंत्री आणि राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा” : मनसे


मुंबई : महाराष्ट्रातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून ऊर्जा मंत्री आणि राज्य सरकार विरोधात तक्रार करण्यात येतेय. वाढीव वीज बिलाबाबत यूटर्न घेणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिलेयत. 


वाढीव वीज बिल कमी व्हावे यासाठी मनसेने या पूर्वी राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार केला होता. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केले होते. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही वाढीव वीज बिल मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची भेट घेतली होती.


काही दिवसांपूर्वी वीज बिल थकबाकी वसुल करा आणि जे थकबाकी देणार नाहीत त्यांची वीज खंडित करा असा आदेश ऊर्जा विभागाने दिले आहे त्या नंतर मनसे आक्रमक झाली आहे. 


मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी सांगितले. सरकारी मान्यतेने राज्यातील जनतेची जी आर्थिक लूट होतेय, त्याविरोधातला हा संतप्त आक्रोश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित प्रजासत्ताकाची निर्मिती आपण खरंच करू शकलो असू तर पोलीस या लुटारुंविरोधात गुन्हे नोंदवतील असेही ते पुढे म्हणाले.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies