आटपाडी तालुक्यातील ह्या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

आटपाडी तालुक्यातील ह्या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

 
आटपाडी : अर्ज माघार घेण्याच्या दिवशी तहसीलदार कार्यालय येथे झालेली गर्दी  

आटपाडी तालुक्यातील ह्या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध


आटपाडी : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०/२१ च्या आज दिनांक ०४ रोजी माघार घेण्याच्या दिवशी आटपाडी तालुक्यातील पात्रेवाडी गावाची ग्रामपंचायत बिनविरोध झाली.


आटपाडी तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. १० ग्रामपंचायती पैकी पात्रेवाडी गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात गावातील स्थानिक पुढारी यांना यश आले आहे.


७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायमध्ये सध्या २ सदस्य पद रिक्त राहिले आहे. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री व पुरुष आशा दोन जागा रिक्त राहिल्या आहेत. बिनविरोध झालेल्या सदस्यामध्ये आक्काताई सुभाष जाधव, शिवाजी तानाजी गायकवाड, अश्विनी भिमराव जाधव, शालन विलास गायकवाड, तानाजी शहाजी पाटील अशी बिनविरोध झालेल्या सदस्यांची नावे आहेत. परंतु अद्याप निवडणूक आयोगाकडून नावांची घोषणा होणे बाकी आहे.


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेसPost a comment

0 Comments