WHO कडून दिलासादायक बातमी ; कोरोना लसीबाबत मोदी सरकार महत्त्वपूर्ण निर्णय़ घेण्याची शक्यता

WHO कडून दिलासादायक बातमी ; कोरोना लसीबाबत मोदी सरकार महत्त्वपूर्ण निर्णय़ घेण्याची शक्यता

 WHO कडून दिलासादायक बातमी ; कोरोना लसीबाबत मोदी सरकार महत्त्वपूर्ण निर्णय़ घेण्याची शक्यतानवी दिल्ली  :  जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली असून भारतात अद्याप ही मिळाली नाही. जागतिक आरोग्य संघटनेने फायझर आणि बायोटेकच्या कोरोना व्हायरस लसीचा आणीबाणी वापर करण्यास परवानगी दिली आहे. या संदर्भात मोदी सरकार महत्त्वपूर्ण आज निर्णय़ घेण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. 
मंजुरीनंतर, डब्ल्यूएचओने सांगितले की ते जगभरातील त्याच्या प्रादेशिक कार्यालयांद्वारे लसीच्या फायद्यांविषयी तेथील देशांशी चर्चा करण्यात येईल. युनायटेड नेशन्सच्या या मंडळाच्या मंजुरीनंतर, जगभरातील देशांमध्ये फायझरच्या कोरोना लसीच्या वापरासाठी मार्ग खुला झाला आहे. त्याचबरोबर कोरोना व्हायरस लशीच्या आपत्कालीन वापरासंदर्भात भारतही मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ही कोरोनाची लस लवकरात लवकर गरीबांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपत्कालीन उपयोग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या यादीमध्ये देशाचं नाव असणाऱ्यांना लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देता येणं सहज शक्य होणार आहे.या लशीला भारतात परवानगी देण्याबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत आपत्कालीन वापरासाठी मंजुरी द्यायची की नाही या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, फायझर आणि भारत बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या लसींचा आपत्कालीन वापरासाठी उपयोग करण्याबाबत आज चर्चा होणार आहे त्यानंतर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments