अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच अभिनेत्रीने केली आत्महत्या

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच अभिनेत्रीने केली आत्महत्या

 अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच अभिनेत्रीने केली आत्महत्या  


मुंबई : कन्नड अभिनेत्री आणि बिग बॉस-3 ची स्पर्धक जयश्री रामय्याने आपलं आयुष्य संपवलं आहे.अभिनेता सुशांत सिंह राजपूतप्रमाणेच तिने आत्महत्या केली आहे. जयश्री रामय्या हिने गेल्या वर्षी जूनमध्येच सोशल मीडियावर आपण आत्महत्या करणार असल्याचं लिहिलं होतं. GOOD BYE TO THE WORLD अशी पोस्ट तिनं केली होती.


जयश्रीने फेसबुकवर ही पोस्ट करताच त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावर सातत्याने येणाऱ्या प्रतिक्रियेनंतर जयश्रीने आपली ती पोस्ट डिलीट केली आणि नवी पोस्ट करून आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. जयश्रीला काहीही झालेलं नाही हे समजताच सर्वांना हायसं वाटलं. सर्वांनी तिला असं पाऊल उचलू नको असा सल्ला दिला होता. जयश्री डिप्रेशनमध्ये होती.  कानडी सुपरस्टारने तिला काम मिळवून देऊन मदत करण्याचंही सांगितलं आणि त्या वेळी टोकाच्या नैराश्यातून ती कशीबशी बाहेर पडली. जयश्रीवर मानसोपचार सुरू होते. पण ती नैराश्यातून पूर्ण बाहेर येऊ शकली नाही.कन्नड स्टार किचा सुदीप बंगळुरूच्या संध्या किराना आश्रमात जयश्री रामय्यावर उपचार सुरू होते. पण ती या आजारातून अखेरपर्यंत बाहेर येऊ शकली नाही.सोमवारी ती कुणाचाही फोन उचलत नसल्याचं, मेसेजला उत्तर देत नसल्याचं तिच्या नातेवाईक आणि मित्रांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने ती ज्या आश्रमात उपचार घेत होती, त्यांच्याशी संपर्क साधला.


आश्रमाच्या लोकांनी तिच्या खोलीत प्रवेश केला, त्या वेळी ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. बंगळुरूच्या पोलीस ठाण्यात आत्महत्येसंदर्भात नोंद करण्यात आली आहे. जयश्री डिप्रेशनमध्ये होती.  कानडी सुपरस्टारने तिला काम मिळवून देऊन मदत करण्याचंही सांगितलं आणि त्या वेळी टोकाच्या नैराश्यातून पूर्ण बाहेर येऊ शकली नाही. जयश्रीवर मानसोपचार सुरू होते.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a comment

0 Comments