नववर्ष स्वागत पार्टीमध्ये तरूणीची हत्या ; या भाजप नेत्याने ट्विटवर केली अशी मागणी

नववर्ष स्वागत पार्टीमध्ये तरूणीची हत्या ; या भाजप नेत्याने ट्विटवर केली अशी मागणी

 नववर्ष स्वागत पार्टीमध्ये तरूणीची हत्या ; या भाजप नेत्याने ट्विटवर केली अशी मागणी मुंबई : मुंबईतील खार परिसरात पार्टीत तिघांमध्ये झालेल्या भांडणातून तरूणीचा मृत्यू झाला.खार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून बॉयफ्रेंडसह एका मुलीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत एक मागणी केली आहे.मुंबईसह देशभरात थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताची पार्टी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात. पण मुंबईतील खार परिसरात जान्हवी कुकरेजा या तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडसह एका तरुणीने बेदम मारहाण केली आणि त्यात जान्हवीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. खारमधील भगवती हायईट्स या इमारतीच्या टेरेसवर नव्या वर्षानिमित्त पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.आशिष शेलार यांनी ट्विट केले. “खारमध्ये नववर्ष स्वागत पार्टीमध्ये तरूणीची हत्या झाल्याची घटना खूपच वेदनादायी आहे. मृत तरूणीच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. मी या प्रकरणी पोलीस उपायुक्तांशी चर्चा केली आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा आणि गुन्हेगारांना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी मी केली आहे”, असं शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज 


Post a comment

0 Comments