राणेंच्या नकलीपणाच्या आरोपावर रोहित पवार म्हणाले...

राणेंच्या नकलीपणाच्या आरोपावर रोहित पवार म्हणाले...
 राणेंच्या नकलीपणाच्या आरोपावर रोहित पवार म्हणाले...


अहमदनगर : कृषी कायद्यांविषयीची भूमिका दुटप्पी आणि नकलीपणाची असल्याचा आरोप भाजप नेते निलेश यांनी रोहित पवार यांच्यावर केला होता. त्यांच्या या आरोपाला रोहित पवार यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. निलेश राणे यांनी ते ट्विट घाईघाईत केले असावे. मी अभ्यास करुनच बोलतो. कोणत्याही बातमीवरुन निष्कर्ष काढताना त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. मात्र, निलेश राणे यांनी केवळ बातमीच्याआधारे ट्विट केले, असे रोहित पवार यांनी म्हटले.

 तेअहमदनगरमध्ये बोलत होते. मी शेती विषयात अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल माझी भूमिका मी सविस्तर मांडत असतो. शेतकरी हिताच्या गोष्टी मी करतो, त्याविषयी लपवालपवी करत नाही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग योग्य पद्धतीने केले तर शेतकऱ्याचा फायदा होतो. मात्र केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात जाचक अटी असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a comment

0 Comments